आमच्या फायद्याच्या गुंतवणूक योजना

गुंतवणूक आजची, चिंता नाही उद्याची.

आम्ही देवी ज्वेलर्स मध्ये कायम काही ग्राहकांच्या फायद्याच्या योजना राबवतो. खाली तुम्हाला सध्या प्रचलित असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती मिळेल.


 • सुवर्ण धनसंचय योजना

  या गुंतवणुकीमध्ये ग्राहकांनी दरमहा किमान १०००/- रुपये व त्यापुढे ५०० च्या पटीत रुपये असे दर महा १२ महिने गुंतवायचे असून तेरावा महिना देवी ज्वेलर्स तर्फे देण्यात येईल व तेराव्या महिन्यात ग्राहकांनी सोने अगर चांदी मोत्याचे दागिने खरेदी करता येतील. सादर रक्कम ग्राहकांनी रोख अगर चेकने आमचे दुकानात जमा करावी लागेल.

 • सुवर्ण वृद्धी योजना

  या योजनेमध्ये ग्राहकांनी कितीही रक्कम देऊन सोने खरेदी करता येईल. अशी खरेदी रोज सुद्धा करता येईल असे एक वर्षभर सोने खरेदी करून झालेनंतर १३ व्या महिन्यात आपल्याला आपले खरेदी केलेले सोने व त्यावर व्याज ९% याप्रमाणे दिले जाईल. या योजनेत आपण चोख वेढणी किंवा दागिने दोन्ही खरेदी करू शकता.

 • सुवर्ण कलश योजना

  या योजनेमध्ये आपण किमान २५ ग्राम चोख सोने अगर वेढणी आमचेकडे जमा करायची असून एक वर्षानंतर ग्राहकाचे सोने व त्यावर ६% व्याज सोन्याच्या स्वरूपात ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये सोन्यातील दरवाढ व त्यावर येणारे व्याज असा दुहेरी फायदा ग्राहकांस होणार आहे.

 • धन वृद्धी योजना

  या योजनेमध्ये ग्राहकास आपणाकडील रोख रक्कम आमच्याकडे गुंतवून त्या रकमेवरील ११% व्याज वर्षाच्या शेवटी  ग्राहकास मिळेल.

 • संपूर्ण भारत बचत योजना.

  आपण आपल्याकडील वापरात नसलेले, तुटलेले अथवा जीर्ण झालेले कोणतेही कितीही जुने सुवर्ण अलंकार आमच्याकडे एक वर्षाकरिता डिपॉझिट करा व वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुठलाही नवीन हॉलमार्क असलेला देवी ज्वेलर्स चा ब्रँडेड दागिना तयार अथवा ऑर्डर प्रमाणे विना मजुरी घेऊन जावा.

Any Questions

captcha