देवी ज्वेलर्स बद्दल

स्वागत करा
  • सोन्याचे.
  • समृद्धीचे.
  • यशाचे.


देवी ज्वेलर्स ची सुरुवात...

सन १९३८ साली परमपूज्य आजोबांनी छोट्या जागेत सुरू केलेला देवी ज्वेलर्स हा सराफी व्यवसाय आज विश्वासार्हता ७५ वर्ष पूर्ण क्षमतेने पुढे वाटचाल करीत आहे.

या ७५ वर्षांमध्ये आमचे येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. दरवर्षी नवनवीन कल्पना व सुधारणा करीत आज आमची पिढी जगाच्या नकाशावर येऊन ठेपली आहे. आमच्या वेबसाईट वर सुद्धा बऱ्याच थोर व्यक्तींनी भेट दिलेली आहे. आजच्या या स्पर्धा युक्त बाजारपेठेमध्ये प्रत्येक वेळी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही आपल्यासाठी नवनवीन कल्पना व तुमच्या पसंतीच्या व फायद्याच्या गुंतवणूक योजना आपण समोर घेऊन येत आहोत.

देवी ज्वेलर्स सातारा जिल्ह्यातील पहिली आय. एस. ओ. मानांकन प्राप्त शोरूम आहे. तसेच साताऱ्यातील एकमेव रजिस्टर्ड ब्रॅण्ड सुद्धा आमचेकडे सोने व चांदी साठी स्वतंत्र दालन असून ग्राहकांना आपले दागिने चोखंदळ पणे निवडता येतात. आमची संस्था अनेक नामांकित बँकेचे व्हॅल्युएटर म्हणूण काम करते.

७५ वर्ष प्रदिर्घ अनुभव व तत्पर सेवा यास आजवर कोठेही तडा दिलेला नाही. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच कोकण विभागातून ग्राहक आवर्जून आमचेकडे खरेदीस येणे पसंत करतात.


देवी ज्वेलर्स चा इतिहास...